यावल शहरात एस.टी.बस-दुचाकीमध्ये अपघात : तरुण जागीच ठार, तिघे जखमी


ST bus-two-wheeler accident in Yaval City:  Youth killed on the spot, three injured यावल  : पेट्रोल पंपावरून ट्रिपलसीट निघालेला तरुण अचानक रस्त्यावर आल्यानंतर भरधाव बस चालकाने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात बस कडेला घेतली मात्र त्यानंतरही अपघात घडल्याने मध्यप्रदेशातील तरुण ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले. सोमवार, 12 जुन रोजी दुपारी तीन वाजता बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल-साकळी दरम्यान महाजन पेट्रोल पंपावर हा अपघात घडला.

अचानक रस्त्यावर दुचाकी आल्यानंतर अपघात
यावल-चाळीसगाव बस (एम.एच.14 बी.टी. 2144) ने राज्य मार्गावरून जात असताना दुचाकीस्वार (एम.पी.09 क्यू.टी.3939) ने अचानक रस्त्यावर दुचाकी आणली मात्र अपघात होईल या भीतीने बस चालकाने बस कडेला घेतल्यानंतरही दुचाकी एस.टी.ला जावून धडकल्याने दयाराम बारेला (25) हा जण ठार तर मांगीलाल कोशा बारेला (28, सुनीता मांगीलाल बारेला (25), व चिंकी मांगीलाल बारेला (3, सर्व रा. शिरवेल, मध्यप्रदेश) तीघे जखमी झाले.

जखमींची प्रकृती गंभीर : जळगावात उपचार
दरम्यान जख्मींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रग्णालयात हलवले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !