भुसावळातील रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष गिरीश तायडेवर हल्ला : आरोपीला सिन्नरमधून अटक


भुसावळ  : पूर्व वैमनस्यातून भुसावळ तालुक्यातील खडका गावातील रहिवासी व रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष गिरीश देविदास तायडे यांच्यावर संशयित जितेंद्र खंडारे याने चाकूचे वार करीत प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यानंतर संशयित पसार झाल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना त्यास नाशिकच्या सिन्नरमधून अटक करण्यात आली. जितेंद्र भागवत खंडारे (खडका, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस हवालदार सुरज पाटील, हवालदार प्रेम सपकाळे, नाईक दीपक जाधव आदींच्या पथकाने संशयिताला सिन्नर येथून अटक केली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार संजय तायडे, हवालदार विठ्ठल फुसे, एएसआय मोरे, पालवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !