जळगाव शहरातील महिलेचा विनयभंग : चौघांविरोधात गुन्हा
molestation of woman in Jalgaon city : Crime against four जळगाव : जळगाव शहरातील मयूर कॉलनी परीसरातील एका भागातील 47 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील मयूर कॉलनी परीसरातील एका भागात 47 वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 11 जून रोजी सायंकाळी सहा वाजता काहीही कारण नसताना समाधान खंडू सोनवणे, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि शालक चौघे (रा.राजीव गांधी नगर, जळगाव) अशा चौघांनी काही कारण नसताना महिलेचे पती व पुतण्या यांना बेदम मारहाण केली, त्यानंतर एकाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला आणि महिलेचे पती आणि पुतण्या यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडीतेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला हवालदार उषा सोनवणे करीत आहे.
