काय सांगता ! : भुसावळात तोट्यातील एस.टी.चे चाक आले नफ्यात
भुसावळ : प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.चे चाक गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर तोट्यात गेले होते मात्र अलीकडे महिलांना 50 टक्के प्रवासात मिळालेली सवलत तसेच ग्रामीण भागासाठी वाढलेल्या फेर्यांमुळे एस.टी.चे तोट्यातील चाक आता नफ्यात आले आहे.
उत्पन्न वाढीमुठे मोठा दिलासा
भुसावळ आगाराचे उत्पन्न मे 2023 मध्ये एकूण उत्पन्न दोन कोटी 90 लाख झाले असून गतवर्षी हेच उत्पन्न मे 2022 मध्ये एक कोटी आठ लाख 92 हजार इतके होते. आगाराने तोटा भरून काढला असून मे 2023 मध्ये आठ लाख 19 हजार एव्हढा नफा वाढाल आहे. भुसावळ आगारातील सर्व चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. प्रवासी बांधवांनी महिला प्रवाशांनी एस.टी.महामंडळाच्या बसने प्रवास केल्यामुळे भुसावळ आगाराचा आठ लाख 19 हजार रुपये नफा झाल्याचे आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी कळवले आहे.
