भुसावळचे तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचा सत्कार


भुसावळ : शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचा भुसावळातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येत अ‍ॅड.निर्मलजी दायमा यांच्या निवासस्थानी घरगुती स्वरूपात सत्कार केला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी व्यापारी शहर संघाचे राधेश्याम लाहोटी, प्रा.डॉ.सुनील नेवे, बार असोशिएशनचे अ‍ॅड.तुषार पाटील, गोकूळ अग्रवाल, गौतम चोरडीया, जयंती सुराणा, सुरेंद्रसिंग पाटील, महेश चौधरी, दीपक टेकवाणी, अभय कोटेचा, अ‍ॅड.गोकुळ अग्रवाल, डॉ.कुशल पाटील, राजेश बाफना, सुनील जोशी, आरती चौधरी, विनीता वाणी, चौधरी, अ‍ॅड.निर्मल दायमा आदींची उपस्थिती होती. आरती चौधरी व विनिीा नेवे यांनी औक्षण करण्यात आले. भुसावळ नगरपालिकेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्ेबेसेडर तथा पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी चिद्रवार यांच्या काळात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्याधिकारी चिद्रवार म्हणाले की, भुसावळकरांच्या सहकार्यामुळे काम करण्याबाबत उत्साह वाढला. अनेक गोष्टी शक्य झाल्या नसल्यातरी भविष्यात त्या होतील. अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !