भुसावळ शहरातील ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत
Welcoming students on the first day at Tapti Public School in Bhusawal city भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लीक सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी सोमवारी शाळेतील इयत्ता नर्सरी ते दहावीच्या 90 टक्के विद्यार्थांनी शाळेत हजेरी लावली. विद्यार्थी सकाळी शाळेत येताच शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले.
स्वागताने विद्यार्थी भारावले
शाळेतील विद्यार्थासाठी शिक्षिकांनी स्वागत गीत गाऊन व नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांची शाळेविषयी गोडी वाढवली. प्रिन्सीपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत गणवेशात येण्याचे व नियमित अभ्यास करण्याच्या सूचना केल्या. शाळेत सायकलीने लांबहून ये-जा करणार्या विद्यार्थांना वाहतूक नियमांच्या सूचना देण्यात आल्या तसेच वाढत्या उन्हापासून बचावाबाबतही सूचना करण्यात आल्या. सोनाली मुजूमदार, स्मिता जाधव, मनप्रीत कौर, ऍनेट मॅथ्यू, हर्षला चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचलन सोफीया पीबॉडी यांनी तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले.

