जळके गावात ज्वेलर्स दुकान फोडले : अडीच लाखांचा ऐवज लांबवला


Jewelers shop broken in Jalke village : compensation of 2.5 lakhs extended जळगाव : जिल्ह्यात सैराट झालेल्या चोरट्यांनी आता सराफा दुकानाकडे मोर्चा वळवत दहा हजारांच्या रोकडसह तिजोरी व चांदी मिळून दोन लाख 35 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना जळगाव तालुक्यातील जळके येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. चोरीची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. सराफा दुकान मालक मनोज प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात चोर ीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सराफा बांधवांमध्ये घबराट
नेरी गावातील रहिवासी मनोज प्रकाश पाटील यांचे जळके येथे कृष्णा ज्वेलर्स नामक सराफा दुकान आहे. या दुकानाचे चॅनल गेट आणि शटर सोमवारी सकाळी उघडे दिसून आल्यानंतर सरपंच विनोद पाटील यांनी दुकान मालक मनोज पाटील यांनी माहिती कळवली. पाटील यांनी दुकानात जावून पाहिले असता दुकानातील लोखंडी तिजोरी, तिजोरीतील दोन हजार 400 ग्रॅम वजनाची चांदी, ड्रावरमधील दहा हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेल्याचे लक्षात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !