यावल शहरात भरधाव बसच्या धडकेने मध्यप्रदेशातील युवक ठार : एस.टी.चालकाविरोधात पोलिसात गुन्हा
Youth from Madhya Pradesh killed in collision with speeding bus in Yaval City : Police case against ST driver यावल : यावल-चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ एस.टी.बस दुचाकीत अपघात होवून मध्यप्रदेशातील 19 वर्षीय युवक ठार झाला होता तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात सोमवारी दुपारी घडला होता. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एस.टी.चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बसच्या धडकेने युवक ठार : तिघे जखमी
यावल शहराच्या बाहेरील चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाजवळ दुचाकी (क्रमांक एम.पी.09 क्यू.टी.3039) वरून दयाराम महारू बारेला (19, मांगीलाल बारेला, सुनीता वारेला व सिंधा बारेला हे जात असताना यावलकडून चोपड्याकडे बस (क्रमांक एम.एच. 14 बी.टी.2144) घेवून चालक राजेंद्र सोनवणे जात असताना पेट्रोप समोर एस.टी.बस आणि दुचाकीचा अपघात घडला. यामध्ये दयाराम बारेला हा जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भरत महारु बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी बस चालक यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.
