हरताळेनजीक टॉवर खचला मात्र अनर्थ टळला : आमदारांच्या तत्परतेने सहा तासात वीजपुरवठा सुरळीत
Tower collapsed near Hartal but disaster was averted: Power supply was smooth within six hours due to MLA’s promptness मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा परीसरात वादळाने अचानक वीजपुरवठा करणारे टावर (हाय व्होल्टेज टॉवर) कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील व शहरातील पुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तब्बल दोन दिवसाचा कालावधी लागणार होता यामुळे तालुक्यातील शेती तसेच आरोग्याच्या सेवा विस्कळीत होणार्या होत्या. आमदार चंद्रकांत पाटील यांना ही बाब कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत उर्जामंत्र्यांसह वरीष्ठ यंत्रणेशी चर्चा केली तसेच अधिकार्यांशी चर्चा करून तातडीने वीजपुरवठा करण्याबाबत आग्रह धरल्यानंतर अवघ्या सहा तासात वीजपुरवठा कार्यान्वीत झाला.
आमदारांच्या सूचनेनंतर यंत्रणा हलली
रविवारी हरताळा परीसरात मोठ्या प्रमाणात अचानक वादळ आल्याने या परीसरात उच्च दाबाने वीज पुरवठा करणारे टॉवरचे नुकसान झाले व दीपनगर ते मुक्ताईनगर असा वीजपुरवठा ठप्प झाला. शहरासह तालुका अंधारात बुडाल्यानंतर आमदारांनी धाव घतली. किमान दोन दिवस मुक्ताईनगर तालुका व शहरातील वीजपुरवठा खंडित राहिल, असे अधिकारी म्हणाले मात्र बागायतदार ल शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची जाणीव आमदारांनी करून देत नागरीकांनाही मनस्ताप होईल म्हणत तातडीने कामांना गती देण्याची अपेक्षा केली. उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. महावितरण व महापारेषणच्या अधिकार्यांनी धाव घेत सहा तासात वीजपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, नादुरुस्त झालेल्या टॉवरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणे झाडे झुळपे होती, वीज कर्मचार्यांना अडचण निर्माण होत होती यासाठी आमदार पाटील यांनी स्वतः दोन जेसीबी यंत्र लावून टॉवरच्या आजूबाजूला असलेली झाडेझुडपे काढून परीसर स्वच्छ केला.

यांची वीजपुरवठा सुरळीतकामी मेहनत
पथकात वीज वितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन, महापारेषण चे अधीक्षक अभियंता अनिल भारसाकडे, पारेषणचे कार्यकारी अभियंता विनोद लोखंडे, महापारेषणचे मुख्य अभियंता संजिव भोळे, अधीक्षक विलास खाचणे, वितरणचे कार्यकारी अभियंता ब्रिजेश कुमार गुप्ता, महापारेषणचे कार्यकारी अभियंता जयंत वाघमारे तसेच मिलिंद भामरे, उपकार्यकारी अभियंता तसेच ज्युनिअर इंजिनियर तसेच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. महापारेषणच्या दहा अधिकार्यांसह तब्बल 30 कर्मचार्यांनीदेखील मेहनत घेत वीजपुरवठा सुरळीत केला.
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परीषदेत प्रसंगी नगरसेवक बबलू कोळी, पियुष महाजन, शिवराज पाटील, संदीप पाटील, दिलीप पाटील, महेंद्र मोंढाळे, आमदारांचे स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते.
