दुचाकी अपघात ; भुसावळातील बांधकाम मिस्तरी ठार


Bike accident ; Construction mason killed in Bhusawal भुसावळ : भरधाव दुचाकी अनियंत्रीत होवून झालेल्या अपघातात भुसावळातील 44 वर्षीय मिस्तरी ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी वरणगाव-भुसावळ रस्त्यावरील लुंबिनी नगराजवळील स्टॉपजवळ घडला. या अपघातात कमरोद्दीन नियोजोद्दीन शेख (44, भुसावळ) असे ठार झालेल्या मिस्तरी कामगाराचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्टॉपवर आदळली
कमरोद्दीन शेख हे भुसावळातील कलिमोद्दीन शेख यांच्यासोबत मिस्तरी काम करून दुचाकी (एम.एच.19 ई.बी.3373) ने परतत असताना भरधाव दुचाकी लुंबिनीनगराजवळील स्टॉपवर आदळल्याने कमरोद्दीन हे जखमी झाले व त्यांचा मृत्यू ओढवला. अपघात प्रकरणी मुजाहिद बिस्मिल्ला शेख (40, बत्तीस खोली, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात कलिमोद्दीन शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !