धक्कादायक : निवृत्त पोलीस उपअधीक्षकाचा सुनेवरच अत्याचार


सोलापूर : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सुनेवर नात्याने सासर्‍यानेच अत्याचार केला. विशेष म्हणजे संशयित हे निवृत्त डीवायएसपी आहेत. प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघा बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
सासर्‍याने दुष्कर्म केल्याची फिर्याद एका सुनेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. 12 जून रोजी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेचा निवृत्त डीवायएसपी यांच्या शिक्षक मुलाबरोबर एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला महाविद्यालयात शिक्षणासाठी ने-आण करण्याची जवाबदारी सासर्‍यावर होती.






घरात एकटी असताना जबरदस्ती अत्याचार !
सासर्‍याने ऑगस्ट 2022 मध्ये सून घरात एकटी असताना जबरदस्ती अत्याचार केला तसेच याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी दिली त्यामुळे भेदरलेल्या पिडीतेने ही बाब कुणालाही सांगितली नाही परंतू याचा गैरफायदा घेत सासर्‍याने दुसर्‍यांदा सुनेवर अत्याचार केला यानंतर मात्र पीडीतेने हिंमत करून आपल्या पतीला सर्व हकीगत सांगितली. सासरे हे वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वेळा बळजबरीने अत्याचार केला असल्याचे पतीला सांगितले मात्र पतीने पीडीतेवर खोटारडेपणाचा आळ घेत वडिलांची बदनामी करते म्हणून शारीरिक व मनसिक छळ चालविला. तसेच तिला माहेरी हाकलून दिले. नंतर तिला नांदविण्यासाठी परत आणले नाही, असेही पिडीतेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !