भुसावळ तालुका खुनाने हादरला : फेकरीतील तरुणाचा खून ; आरोपीला अटक


Bhusawal taluka rocked by murder : murder of young man in Fekri ; The accused was arrested भुसावळ : तालुक्यातील फेकरी गावातील 23 वर्षीय युवकाचा दुचाकीवरून ढकलून दिल्याने डोक्यावर पडताच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फेकरी उड्डाण पुलाजवळील साकरी सर्विस रोडवर शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली. मंगल शांताराम शेळके (23, फेकरी, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

जुन्या वादातून तरुणाची हत्या
भुसावळ तालुका पोलिसात आकाश शांताराम शेळके (25, रा.फेकरी, वाल्मिक नगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम शेळके (23) याच्यासोबत पूर्वी झालेलाा वाद उकरुन संशयित राहुल तुकाराम पाडळे (28, मु.पो. फेकरी, ता.भुसावळ) याने 16 जूनच्या रात्री 12 ते शनिवार, 17 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मंगलची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली तसेच त्याच्याशी झटापट करुन त्याला मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 ई.बी.2024) वर जबरदस्तीने बसवत जोराने ढकलून दिल्याने तो फेकरी उड्डाणपुलाखाली पडल्याने त्यास जबर दुखापत होवून मेंदूला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

संशयिताला केली अटक
खून प्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित राहुल तुकाराम पाडळे (28, फेकरी) यास अटक केली आहे. तपास पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !