22 वर्षीय युवतीवर तिघांचा अत्याचार


वाशिम : माहुली शेत शिवारात 16 जून ते 18 जूनपर्यंत आळीपाळीने 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित युवतीने मानोरा पोलीस स्टेशनला 18 जूनला फिर्याद दिल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली.

घरी न सोडता केला शेतात अत्याचार
22 वर्षीय पीडीता आपले घरावरील टीन व सिमेंट घेण्यासाठी मानोरा येथील एका दुकानात वडिलांसोबत आल्यानंतर दुकानातील मिथुन जनार्थन राठोड याच्यासोबत तिची ओळख झाली. 16 जूनला फोन करून त्याने पिडीत युवतीला भेटायला बोलाविले. दुपारी एक वाजता तो मित्र नितीन दयाराम पवार याच्यासोबत दुचाकीने आला. तेवढ्यात मिथून राठोडला दुकानावरून फोन येत असल्याने तो निघून गेला आणि युवतीला गावी सोडून दे, असे त्याने मित्राला सांगितले. मित्राने मात्र युवतीस घरी न नेता एका शेतशिवारात नेत अत्याचार केला. त्यानंतर फोनवर देवसरी उत्तम चव्हाण यालाही बोलाविले. त्यानेसुद्धा बलात्कार केला. ही घटना 16 जून ते 18 जूनदरम्यान घडली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !