संविधान बचाव समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचा पाठिंबा


सीएए रद्द करण्यासह एनआरसी कायदा लागू न करण्याची मागणी

भुसावळ : केंद्र सरकारने लागू केलेला सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी लागू न करण्याच्या मागणीसाठी भुसावळ तहसील कार्यालयसमोर संविधान बचाव समितीच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनास वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे सोमवारी जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठाण, राज्य सचिव प्रकाश सरदार, उपाध्यक्ष मन्साराम कोळी, प्रकाश तायडे, संतोष तेलंग, संजय पाटील, रणजित पवार, सुरेंद्रसिंग ठाकूर, नासिर खान, शकिल खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !