पाळधी दंगलीतील 58 संशयितांना वर्षभर गावात येण्यास बंदी


58 suspects in the Paladhi riots banned from coming to the village for a year धरणगाव :  मशिदीजवळून पालखी जात असताना वाद्य वाजवल्याच्या वादातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात 29 मार्च रोजी घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या 58 जणांना एक वर्षांसाठी पाळधी गावात येण्यास मनाई करण्यात आली असून तसा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देत संशयिताना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, दंगल प्रकरणी 35 संशयित अद्यापही पसार आहेत.

35 संशयित अद्याप गवसेना
पाळधी गावात 29 मार्च रोजी गावातील मशिदीजवळून दिंडी जात असताना वाद्य वाजवल्याच्या रागातून दगडफेक होवून दंगल उसळली. या चार पोलिसांसह सहा जण जखमी झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांतील शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत 58 जणांना अटक केली तर अद्यापही 35 संशयित हे पसार झाले आहेत. दंगलीनंतर गावात संचारबंदीदेखील लावण्यात आली होती.

अटी व शर्ती घालून संशयितांना जामीन
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अपील केले मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने संशयितांनी औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने 58 आरोपींना जामीन दिला असला तरी अनेक अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. 58 संशयित आरोपींना वर्षभरासाठी पाळधी गावात गावबंदी करण्यात आली आहे तसेच न्यायालयाने सर्व संशयित आरोपींचे 50 हजार रुपयांचे हमीपत्र भरून द्यावे. पाळधी व्यतिरीक्त इतर ज्या ठिकाणी संशयित राहतील, त्या ठिकाणाबाबतची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र संशयितांना भरावे लागणार आहे. प्रतिज्ञापत्र भरल्यानंतर, संशयित ज्या ठिकाणी राहणार असल्याचे नमूद करेल, त्याच ठिकाणी संशयिताला वर्षभरासाठी राहावे लागणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !