जळगावातून चार वाहनांचे सायलेन्सर लांबवले


Silencers of four vehicles were extended from Jalgaon जळगाव : शहरातील अजिंठा रोडवर असलेल्या मानराज मोटर्स समोरील मोकळ्या जागेतून चार चारचाकी वाहनांचे 80 हजार रुपये किंमतीचे सायलेंन्सर लांबवण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार वाहनांचे सायलेन्सर लांबवले
शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरातील शारदा शाळेजवळ दिनेश भगीरथ पाटील (43) हे वास्तव्यास आहेत. ते वर्कशॉपमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. त्यांनी अजिंठा रोडवरील मानराज मोटर्सच्या समोर असलेल्या मोकळ्या प्लॉटमधून 12 एप्रिल ते 26 मे रोजी दरम्यान चार मारुती इको वाहन पार्किंग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वाहनाचे 80 हजार रूपये किंमतीचे चार सायलेंन्सर लांबवले. हा प्रकार घडल्यानंतर दिनेश पाटील यांनी शनिवार, 24 जून रोजी दुपारी तीन वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय अतुल वंजारी करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !