खेळाडूच्या कोट्यातून सैन्य दलात चालक म्हणून लावण्याच्या नावाखाली जळगावच्या तरुणाची सहा लाखात फसवणूक
A young man from Mohadi was cheated of six lakhs in the name of army recruitment जळगाव : सैन्यात कोट्यातून चालक म्हणून भरती करून देण्याचे आमिष दाखवत मोहाडीतील तरुणाची सहा लाख 10 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील अर्जुन सोपान गवळी (23) हा युवक अनेक दिवसांपासून खासगी वाहनावर चालक आहे. त्याचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर वडिलांच्या ओळखीचे संतोष रमेश वराडे 50, रा.भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी अर्जुनला सैन्यात लावून द्या, असे सांगितले तसेच यासाठी पैसे भरावे लागतात, तुम्ही पैसे दिले तर अर्जुनला स्पोर्टस कोट्यातून सैन्यात चालक म्हणून नोकरी मिळू शकते, अशी थाप मारली. भोपाळ येथे तुषारसिंग मलिक व साहिल धडवाल यांना चार लाख 10 हजार रुपये बँक खात्यातून तर चार लाख रोख अशी एकूण 8 लाख 10 हजार रुपयांची रक्कम दि. परंतू पैसे देवून नोकरी मिळत नसल्याने दिलेले पैसे तरुणाने मागितले असता दोन लाख रुपये परत देण्यात आले तर उर्वरीत सहा लाख 10 हजार रुपये परत मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अर्जून गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार, 24 जून रोजी सायंकाळी सात वाजता संशयित आरोपी संतोष रमेश वराडे, तुषारसिंग मलिक व साहील धडवाल यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.



