माहेरी येतात तरुण विवाहितेने प्रियकरासह पाचोर्यात केली आत्महत्या
A young married woman commits suicide by stealing along with her lover पाचोरा : पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत जितेंद्र राजू राठोड (19) व साक्षी सोमनाथ भोई (18) या प्रेमी युगूलाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेतील आत्महत्या केललेया साक्षीचे 23 जून रोजीच लग्न झाले असून ती रविवारी माहेरी आल्यानंतर हा प्रकार घडला. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसल्याने पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्रेमी युगूलाच्या आत्महत्येने शहरात खळबळ
जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच पाचोरा शहरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक वसावे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले.
मध्यरात्री भेट अन् टोकाचा निर्णय
साक्षीचे 23 जून रोजी लग्न झाल्याने ती सासरी गेल्यानंतर पुन्हा रविवारी माहेरी पाचोरा येथे आली होती. मध्यरात्री तरुण विवाहिता घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू असतानाच घराच्या मागील बाजूस अंगणवाडीत दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर कुटूंबियांना मोठा धक्काच बसला.
एकाच गल्लीत दोघांचे वास्तव्य
मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परीवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परीवार आहे. जितेंद्र राठोड याचा परीवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोईचा परीवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो. दोघेही परीवार शहरातील एकाच भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, जितेंद्रने बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. दोघांच्या मृत्यूमुळे पाचोरा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.