Rape of woman in Parola Taluka पारोळा तालुक्यातील महिलेवर बलात्कार : एकाविरोधात गुन्हा
Rape of woman in Parola Taluka : Crime Against One
पारोळा : ओळखीतील संशयिताने महिलेला दुचाकीवरून सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर जंगलात अत्याचार केल्याची घटना तालुक्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताविरोधात गुन्हा
पारोळा तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. याच गावातील संशयित लखन जगन पवार याने रविवार, 25 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिडीत महिलेला ओळखीचा फायदा घेत दुचाकीवर बसवून जंगलात नेत त्याने पीडीतेचे तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरीने अत्याचार केला. भेदरलेल्या पीडीतेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत लखन पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

