भरधाव प्रवासी रीक्षाने कानळदा रस्त्यावर दुचाकीला उडवल्याने तिघे ठार


Three people were killed when a speeding rickshaw overturned a two-wheeler on Kanalda road
जळगाव :
प्रवासी रीक्षाने समोरून दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार चालकासह 15 वर्षीय अल्पवयीन तरुणी व 45 वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक सोमवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मयत झालेल्या महेश गोकूळ जोशी (पिंप्री, ता.धरणगाव) यांची ओळख पटली असून अल्पवयीन मुलीसह महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती

रीक्षाने समोरून दिली धडक
जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवार, 26 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता महेश गोकूळ जोशी (पिंप्री, ता.धरणगाव) हे दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.वाय. 9903) ने ट्रिपल सीट कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत असताना कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोर जळगावकडून काळदाकडे रीक्षा क्रमांक (एम.एच.19 व्ही.8070) ने समोरून दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तिघे रस्त्यावर पडले व अपघातानंतर रीक्षाही उलटली. या अपघातात रीक्षातील प्रवासी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनीता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रीक्षा चालक रवींद्र भावलाल पाटील (सर्व रा.आव्हाणे) हे जखमी झाले. यावेळी काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती.

उपचारादरत्यान तिघांचा मृत्यू
खाजगी वाहनातून दुचाकीवरील तीनही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवरील तिघा जखमींपैकी अनोळखी तरुणीसह दुचाकीस्वार महेश जोशी यांचा मृत्यू ओढवला तर अनोळखी महिलेची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांसह प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक आप्पासो पवार आदींनी धाव घेतली.

मयतांनी लिप्ट घेतल्याचा संशय
अपघातात मयत झालेले जोशी पूजा-पाठ करून रहाटगाड ओढत असल्याची माहिती मिळाली तर अल्पवयीन मुलीसह महिलेला त्यांनी लिप्ट दिल्याची प्राथमिक अंदाज असून रात्री उशिरापर्यंत अनोळखींची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !