विवाहितेच्या छेडखानीतून बांभोरीतील युवकाचा खून : संशयिताला अटक
Marriage Involvement Teasing Youth Murder in Bamhori: Suspect Arrested धरणगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावातील आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (22, रा.शनिपेठ, बांभोरी, ता.धरणगाव) या युवकाचा खून विवाहितेची छेडखानी करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (40, बांभोरी, ता.धरणगाव) यास उस्मानाबाद येथून अटक केली आहे. दरम्यान, संशयितासोबत मंडळाधिकारीदेखील असल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग अद्याप स्पष्ट झालेला नाही. संशयित नन्नवरे यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
छेडखानी केल्याचा डोक्यात राग
शुक्रवार, 23 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आशिष हा गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला असता त्याचा धारदार शस्त्र डोक्यात मारून खून करण्यात आला होता. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात मयत आशिष हा गावातील विवाहितेची छेडखानी करीत होता व हा प्रकार विवाहितेच्या पतीने पाहिल्यानंतर त्याने पाळत ठेवून आशिषची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाल्यासे उस्मानाबाद येथून अटक करण्यात आली. त्यानुसार एलसीबीचे पथकांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन संशयित छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय 40, रा. बांभोरी ता. धरणगाव) व त्याचे सोबत असणारे मंडळ अधिकारी (आप्पा) अमोल विक्रम पाटील (वय 34, रा. कल्याणी नगर, दादावाडी परिसर, जळगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांना धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

मंडळाधिकार्यावर सहभाग तपासून होणार कारवाई
संशयित अमोल पाटील याच्यासोबत मंडळ अधिकारीदेखील असल्याने त्यांना चोकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग अद्याप स्पष्ट झाला नसल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले करीत आहेत.
