वरणगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट

शिवसेनेने विचारला जाब : मुख्याधिकारी यांना दिले निवेदन; पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारला जाब


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे नगरपरीषदेच्या माध्यमातून 25 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम होत असून हे पूर्णता अनियमित आणि दर्जाहिन निकृष्ट दर्जाचे होत असतानाही प्रशासन स्तरावरून वेळोवेळी या कंत्राटदाराची पाठराखण केली जात आहे. निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर कार्यवाही करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता नगरपरीषद प्रशासनासह पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे करीत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

सेना स्टाईल विचारला जाब
नगरपरीषद कार्यालयात नुकतेच रुजू झालेले पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर पवार यांना वरणगाव शहरात 25 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात येत असलेली पाईपलाईन ही दर्जाहीन, निकृष्ट असल्याची बाब यांच्या शिवसेना स्टाईलने निदर्शनास आणून देण्यात आली.

प्रस्तावित नकाशा प्रमाणे पाईप लाईन नाही
मुदत संपूनही कंत्राटदारास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी कोणताही दंड आकारला गेला नाही किंवा कार्यवाही केली गेली नाही. तांत्रिक आराखड्याप्रमाणे जलवाहिनी ही एक मीटर ऐवजी केवळ एक फूट इतक्या खोलीवर टाकण्यात येत आहे. ज्याचे थेट पुरावे सोशल मीडियात आणि नागरीकांच्या प्रत्यक्षात पाहण्यात आले आहे. पाईप लाईनच्या खाली कोणतेही मुरुमाची लेव्हलिंग करण्यात आलेली नाही. प्रस्तावित नकाशा प्रमाणे पाईपलाईन करण्यात आलेली नाही. जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन हे निकृष्ट कामे केली जात आहे त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खोदकाम करून पाईप टाकून झाल्यावर कोणतीही दबाई केली गेली नाही. ज्यामुळे मातीचे ढीग होऊन पावसात सर्व रस्ते चिखलमय होऊन दुचाकी वाहने आणि नागरीरकांना त्यामुळे होणार्‍या त्रासाला सामोरे जावे लागेल.

कंत्राटदारावर ही मेहेरबान का ?
पाण्याच्या टाक्या प्रस्तावित जागेवर इतर ठिकाणी बांधल्याने प्रवाह प्रभावीत होऊन भविष्यात अडचण निर्माण होणार आहेत. शहरात मंजूर आणि कार्यारंभ आदेश निघालेले विकास कामे संबंधित कंत्राटदारामुळे अद्याप सुरुवात करता येत नाही. कंत्राटदाराची अनियमतता निकृष्ट कार्यवसान पद्धती, संथतीने सुरू असलेले काम यामुळे यार योजनेस पूर्ण करण्याचा अक्षम्य असा वेळ लागला व वरणगावकरांचा पाणी प्रश्न अद्यापही सुटू शकलेला नाही. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, शासकीय रकमेची वसूली करून इतर कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्याबाबत विचार करावा व कार्यवाही न झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने याचा विचार करेन तसेच कायदा सुव्यवस्थचां प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी निवेदन देतेवेळी शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, युवा सेना जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, उपशहर प्रमुख सुनील भाई, शाखाप्रमुख संजीव कोळी, शाखाप्रमुख शेख सत्तार, महिला संघटिका योगिता सोनार, प्रल्हाद माळी, हनीफ कच्ची, ईकबालुद्दीन काझी, गोली भोई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !