जळगावात आंदोलनापूर्वीच अ‍ॅड.रोहिणी खडसेंसह पदाधिकारी ताब्यात


Even before the agitation in Jalgaon : officials including Adv.Rohini Khadse were detained जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात काळे झेंडे दाखवण्याच्या इशारा देण्यात आल्यानंतर जळगावात पोलिसांनी अ‍ॅड.रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात दाखल झाले असून उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री महोदयही जळगावात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आंदोलनाचा इशारा देणार्‍या राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

कार्यक्रमात दाखवणार होते काळे झेंडे
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आज जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आले असता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली.

खबरदारीचा उपाय म्हणून कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणार होते. तसा इशारा पक्षाकडून देण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !