कानळदा रस्त्यावरील मयत झालेल्या अनोळखी निघाल्या जळगावातील मायलेकी
The deceased on Kanalda road turned out to be Mileki of Jalgaon जळगाव : भरधाव रीक्षाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तिघे ठार झाले होते. दुचाकीस्वाराची ओळख पटली मात्र अन्य दोघांची ओळख न पटल्याने तपास सुरू असताना मयत या जळगावातील माय-लेकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत या शिवाजी नगरातील मायलेकी असून बुधवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गायत्री प्रवीण कुळकर्णी (34) आणि नंदिनी प्रवीण कुळकर्णी (11, शिवाजी नगर, जळगाव, ह.मु.बडवाणी मध्यप्रदेश) असे मयत झालेल्या दोन्ही मायलेकींची नावे आहेत.
अपघातात तिघे झाले होते ठार
जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवार, 26 जून रोजी सकाळी दहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी (रा. पिंप्री ता. धरणगाव) हे दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.वाय. 9903) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत असताना त्यांच्या दुचाकीवर अनोळखी महिला आणि एक मुलगी बसलेले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना भरधाव रीक्षा क्रमांक (एम.एच.19 व्ही.8070) ने रोडवरील तिघांना चिरडले व अपघातात रीक्षा देखील पलटी झाली. यात अपघातात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील महेश जोशी यांची ओळख पटली होती तर सोबत असलेल्या महिला आणि मुलीची ओळख पटलेली नव्हती. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिसांनी अखेर ओळख पटविण्यास यश मिळवले. गायत्री प्रवीण कुळकर्णी (34) आणि नंदिनी प्रवीण कुळकर्णी (11) अशी दोघांचा मयत माय-लेकींची नावे आहेत.

शाळेत जाताना गाठले मृत्यूने
मयत मुलगी नंदिनी हिच्या शैक्षणिक कामासाठी दाखला काढण्यासाठी महिला गायत्री कुळकर्णी ह्या नात्यातील महेश जोशी यांच्या दुचाकीने कानळदा रोडवरील समर्थ शाळेत जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील करीत आहे.
