Dhanora village youth dies due to electric shock धानोरा गावातील तरुणाचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू


Dhanora village youth dies due to electric shock जळगाव : जळगाव तालुक्यातील धानोरा गावातील तरुणाचा शेतातील इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सुनील खंडू धनगर (30) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जागीच झाला मृत्यू
सुनील हा तरुण शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होता. गावानजीक धानोरा शिवारात त्याचे शेत असून मंगळवार, 27 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो शेतात गेल्यानंतर शेतात पाणी देण्यासाठी विहिरीजवळील ईलेक्ट्रीक मोटार चालू करताना त्यास विजेचा जोरदार धक्का बसताच त्याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर शेजारील शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी तातडीने खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत बुधवारी सकाळी 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई मंगलाबाई, पत्नी सोनूबाई, भाऊ कैलास, दोन विवाहित बहिणी आणि तीन मुली असा परीवार आहे.


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !