भुसावळात समान नागरी कायद्यास मुस्लिम मंचचा विरोध : प्रांतांधिकार्यांना निवेदन
भुसावळ : समान नागरी कायद्यास मुस्लिम मंचचा विरोध असून हा कायदा करू नये, अशी मागणी मुस्लिम मंचतर्फे या कायद्यास विरोध करण्यात आला आहे. असे निवेदन मुस्लिम म्हणजेतर्फे प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. मुस्लिम मंचतर्फे प्रांतांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, सरकार समोर प्रस्तावित समान नागरी संहितेची रूपरेषा असे सुचवते की ते रीरया व कौटुंबिक कायद्याशी अनेक बाबतीत विरोधाभास करत असल्यामुळे आम्हा मुस्लिमांना ते धार्मिक दृष्टिकोनातून मान्य नाही. शिवाय ते देशाच्या हिताचे नाही, कारण भारत हा विविध धर्म आणि विविध परंपरांचा देश आहे आणि ही विविधता हेच त्याचे सौंदर्य आहे.
तर राष्ट्रीय सुरक्षेवर परीणामाची भीती
भारतातील विविधता नष्ट करून त्यांच्यावर एकच कायदा लादला गेला तर त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर परीणाम होण्याची शक्यता आहे. हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या व्यक्ती कायद्याला धक्का लागणार नाही, या एकाच आश्वासनावर सरकारने विविध फुटीरतावादी जमातींना राष्ट्रीय प्रवाहात सामावून घेतले आहे. गटांच्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करणे अनावश्यक आहे आणि हाच घटनेचा आत्मा आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याचीी अंमलबजावणी करू नये. अशी एक मुखी मागणी शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकार्यांनी एकत्रीत येऊन विधी आयोगाचे अध्यक्ष यांना प्रांतअधिकारी यांच्यातर्फे निवेदन देऊन केली.

शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
प्रांताधिकारी यांना निवेदन देतांना माजी नगरसेवक साबीर शेख यांचया नेतृत्वात मुजाहिद शेख, जुनेद अश्रफ खान, बशीर ठेकेदार, निसार झुलेवाले, सिकंदर खान, फिरोज कुरेशी, इर्शाद पटेल, नजर शेख, शाकीर पिंजारी, सद्दाम खाटीक, सागर कुरेशी, फिरोज कुरेशी आदींची उपस्थिती होती.
आक्षेप नोंदवण्याचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, डॉक्टर, वकील, धार्मिक आणि विशेषता महिला आणि लहान मोठ्या संघटना व विविध व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी या कायद्याविरोधात 13 जुलैच्या आत आपला लेखी विरोध नोंदवावा तसेच विरोध नोंदवण्यासाठी विधी आयोगाकडे लिखीत स्वरूपात मेल अथवा निवेदन देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
