जळगावात पिस्टलाच्या धाकावर दहशत : आरोपी जाळ्यात


Terror at gunpoint in Jalgaon: Accused in jail जळगाव : गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्‍या संशयिताच्या एलसीबीने मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितीन शंकर फुलमाळी (28, विजय नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी बुधवार, 28 जून रोजी रात्री 11 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानराज पार्क परीसरात संशयीत आरोपी नितीन शंकर फुलमाळी (28) हा हातात गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस घेवून दहशत पसरवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पथकाने बुधवार, 28 जून रोजी रात्री 9 वाजता कारवाई करत संशयित आरोपीला मानराज पार्क परीसरातून अटक केली. त्याच्याकडून 30 हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी पोलीस नाईक अविनाश देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नितीन फुलमाळी विरोधात रामानंदनगर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार निलेश पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !