चाळीसगावातील दुकानदाराची सोन्याची अंगठी व रोकड लंपास
A gold ring and cash of a shopkeeper in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील व्यापार्याला बोलण्यात गुंतवून भामट्याने 35 हजार रुपये किंमतीची अंगठी व दिड हजारांची रोकड लांबवल्याची घटना शहरातील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील शिवछाया इलेक्ट्रॉनिक दुकानात घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल होताच संशयिताला बेड्या
महेश शिवाजी देशमुख (47, पवारवाडी विठ्ठल मंदिराजवळ, चाळीसगाव) यांचे शहरातील नगरपालिका कॉम्प्लेक्समध्ये शिवशाही इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. बुधवार, 28 जून रोजी दुपारी 12 वाजता ते दुकानावर असताना संशयित आरोपी भोगाभाई छगन सलाट (47, रा.पिंकानगर, वडोदा रा.गुजरात) हा तिथं आला. त्याने महेश देशमुख यांच्या मालकीचे 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि दीड हजार रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार घडल्यानंतर महेश देशमुख यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी भोगाभाई छगन सलाट यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.