A flurry of thieves in Chalisgaon: चाळीसगावात चोरट्यांचा धूमाकूळ : जमीन व्यावसायीकाचे घर फोडले ; ज्वेलर्स दुकान फोडताना मालकाला जाग आल्याने चोरटे पसार
A flurry of thieves in Chalisgaon: The house of a land dealer was broken into; Thieves escape as the owner wakes up while breaking into a jeweller’s shop चाळीसगाव : शहरातील प्रसिद्ध जमीन व्यावसायीकाकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली तसेच काही अंतरावरील आर.के.ज्वेलर्स शॉप फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने ज्वेलर्स मालक राकेश मोरे यांना जाग आल्याने चोरटे पसार झाले. या घटनेने चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस सीसीटीव्ही आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
अनिल वामनराव विसपुते हे जमीन व्यावसायीक असून त्यांचे कुटूंब मंगळवार, 27 रोजी गावाला गेल्याने घराला कुलूप होते. गुरुवार, 29 रोजी सकाळी साडे सात वाजता विसपुते हे घरी आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाज्याचे सेंट्रल लॉक व कड्या तुटलेल्या दिसल्याने त्यांनी पोलिसांना सूचित केले. चोरट्यांनी घरातील दोन्हीही बेडरूमच्या दरवाज्याचे लॉक तोडत कपाटातील सुटकेसमधील चांदीचे शिक्के व रोख रक्कम लांबवली. त्यात 97 हजार 200 रुपयांची रोकड, दोन हजार रुपये किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे चार शिक्के, 20 हजार रुपये किंमतीचे 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे एक ताट, दोन हजार 500 रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे एक लॉकेट असा एकूण 1 लाख 21 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
पोलीस अधिकार्यांची धाव
शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल टकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांनी भेट देवून पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले होते. हॅपी श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. अनिल विसपुते यांच्या फिर्यादी वरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.