विठूराया पाऊस प्रसाद दे…मातीत हिरवा अभंग फुलू दे
चाळीसगावच्या पटेल विद्यालयातील चिमुड्यांचे साकडे
चाळीसगाव : शहरातील व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरीसह बालक मंदिरातील चिमुरड्यांनी शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढत ‘विठूराया पाऊस प्रसाद दे…मातीत हिरवा अभंग फुलू दे…’ असे साकडेच घातले. वारकरी वेषातील चिमुरड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. पालखी पूजन शाळा समितीचे चेअरमन व योगाचार्य क.मा.राजपूत यांच्यासह पालकांच्या हस्ते सहपत्नीक करण्यात आले.
पाऊस पडण्यासाठी विठ्ठलाला साकडे
चाळीसगाव परीसरात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली असून खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाणीटंचाईचे देखील सावट उभे ठाकले असून शेतकरी चिंताक्रांत झाले आहे. आषाढीच्या पर्वणीवर नेताजी चौक, म. फुले कॉलनी, करगाव रोड आदी भागातून काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी पांडुरंगाला पावसासाठी साद घातली. हाती टाळ घेत आणि मुखी हरिनामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे ठिकठिकाणी नागरीकांनी स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा नानकर, ज्येष्ठ शिक्षक जिजाबराव वाघ, त्रिशला निकम आदि उपस्थित होते. दूपार सत्रातही शाळेत सोहळा पार पडला. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचीव डॉ. विनोद कोतकर, आ.बं.मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी कौतुक केले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी अनिल महाजन, राजश्री शेलार, मनिषा सैंदाणे, अजयराव सोमवंशी, सचिन चव्हाण, शर्वरी देशमुख, प्रशांत महाजन, ज्योती कुमावत, दिपाली चौधरी, स्मिता अमृतकार, कविता साळुंखे, रेखा चौधरी, रंजना चौधरी, सचिन पाखले, दत्तात्रय गवळी आदींनी सहकार्य केले.



