कर्जापुढे टेकले हात : जळगावातील ट्रक चालकाची स्मशानभूमीत आत्महत्या
Hands bowed before debt: Jalgaon truck driver commits suicide in graveyard जळगाव : वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यवसायाने ट्रक चालक असलेल्या तरुणाने शिरसोलीनजीकच्या स्मशानभूमीत आत्महत्या केली. संजय हरी पाटील (40) असे मयताचे नाव आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली.

कर्जापुढे टेकले हात
शिरसोली येथील संजय हरी पाटील हा ट्रक चालक होते व संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्यांनी पत्नी व भावांना शिर्डी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले मात्र तो शिर्डीला न जाता शिरसोली गावातील स्मशानभूमीच्या शेंडमध्ये आला. या ठिकाणी शर्टच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब गावातील गोलू पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिस पाटील शरद पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई वडील व तीन भाऊ असा परीवार आहे.