नशिराबादला गोमांस विक्री : दोघांना अटक
Selling beef to Nashirabad : Two arrested जळगाव : नशिराबाद येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवार, 30 जून रोजी दुपारी एक वाजता नशिराबाद पोलिसांनी केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नशिराबाद गावात एका सिमेंटच्या पक्के घराच्या खालच्या मजल्यात खोलीत दोन तरुण हे शासनाने बंदी घातलेल्या गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जाऊन छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो गोमांस व इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत प्रकाश मिटकरी यांच्या फिर्यादीवरून गोमांस विक्री करणार्या समील शहा खलील शहा (32, रा.काजीपुरा नशिराबाद) व शेख मेहबूब शेख गुलजार (41, फुकटपुरा नशिराबाद) या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल युनूस शेख हे करीत आहेत

