भुसावळातील साखळी उपोषणाला काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचा पाठिंबा
सीएए कायदा रद्द करण्यासह एनआरसी व एमपीआर कायद्याला विरोध
भुसावळ : केंद्र सरकारने लागू केलेला सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी व एमपीआर कायदा लागू न करण्याच्या मागणीसाठी भुसावळ तहसील कार्यालयासमोर संविधान बचाव समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून या आंदोलनाला मंगळवारी भुसावळ विधानसभा युत काँग्रेस व काँग्रेसच्या सर्व फ्रंटलने पाठिंबा दर्शवत तहसील प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
साखळी उपोषणाचा सहावा दिवस
मंगळवारी साखळी उपोषणाच्या सहाव्या दिवशी भुसावळ युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, वरणगाव काँग्रेस, शहर तालुका काँग्रेस, भुसावळ अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकार्यांनी एनआरसी व एनपीआर हा काळा कायदा असून त्यास विरोध दर्शवत राष्ट्रपतींच्या नावे तहसील प्रशासनाला निवेदन दिले. समितीचे अध्यक्ष सलीम भाई यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.मुन्वर खान, जिल्हा समनवयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष हितेश पाटील, भुसावळ विधानसभा युत अध्यक्ष ईम्रान खान, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, भुसावळ तालुका काँग्रेस सचिव राजेंद्र श्रीनाथ आदींनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेस कमेटी वरणगाव शहराध्यक्ष अशपाक काझी, सलीम गवळी, कलीम बेग, दानीश पटेल, ईरफान खान, शे.युनूस, सुनील जावरे, शाहरुक शेख, फिरोज, रमेश जैन, मेहबूब खान, ईस्माईल गवळी, राजेंद्र पटेल, रघुनाथ चौधरी, ईकबाल पिंजारी, भगवान मेढे, जॉनी गवळी, संजय खडसे, संदीप सपकाळे, रवी सातदीवे, विनोद देवरे, राहुल गिराड,े वरणगावचे मुस्लिम पिंजारी, शैलेंद्र बोदडे, वसीम खान, मारुडचे हसरत अली, फैजपूरचे युवक अध्यक्ष वसीम खान मसरत आदींची उपस्थिती होती.


