मालखेडा येथील स्टोन क्रशरच्या ऑफिसमध्ये दरोडा : 50 हजारांची रोकड लांबवली


Robbery in office of stone crusher in Malkheda: Cash of 50 thousand was recovered जामनेर : जामनेर तालुक्यातील मालखेडा शिवारातील नर्मदा स्टोन क्रशरच्या कार्यालयात 25 ते 30 अज्ञातांनी दरोडा टाकत 50 हजारांची रोकड तसेच पाच हजार रुपये किंमतीची डीव्हीआर मशीन लांवबल्याची घटना शुक्रवार, 30 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. मालखेडा परीसरात दगड फोडण्याचा आवाज आल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

असे आहे नेमके प्रकरण
मॅनेजर टिकेश दीपक मगर उर्फ पप्पूदादा (20, चिंतामणी कॉलनी, पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी दगड फोडण्याचा आवाज आल्यानंतर 25 ते 30 संशयित हातात लाठ्या व लोखंडी रॉड घेवून कंपनीच्या कार्यालयात धडकले व त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या तसेच आरओ मशीनची तोडफोड केली तसेच ऑफिसमधील 50 लीटर डिझेल फेकून व दोन कॅमेर्‍यांचे नुकसान केले तसेच 50 हजारांची रोकड लांबवली. या घटनेत 60 हजारांचे नुकसान झाले. पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !