Dhoom style जळगावात धूम स्टाईल महिलेची एक लाख 20 हजारांची पोत लंपास
Dhoom style woman’s texture worth 1 lakh 20 thousand sold in Jalgaon जळगाव : शहरात धूम स्टाईल चोर्या थांबायला तयार नाहीत. 58 वर्षीय महिला पायी चालत असताना धूम स्टाईल येत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीची पोत लांबवल्याची घटना हरेश्वर नगरातील वृंदावन अपार्टमेंटसमोर घडल्याने महिलावर्गात घबराट पसरली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात दोन चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांना शोधण्याचे आव्हान
ललना चंद्रमोहन टेमकर (58, वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर नगर, जळगाव) या शनिवार, 1 जुलै रोजी रात्री सव्वाआठ वाजता अपार्टमेंटसमोर उभ्या असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अलगद लांबवली. महिलेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी टेमकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहेत.


