जळगावात विवाहितेची छेडखानी : पतीलाही केली मारहाण
Harassment of married woman in Jalgaon : Husband was also beaten जळगाव : औषधी आणण्यासाठी जात असलेल्या विवाहितेची छेडखानी करण्यात आली तर विरोध केल्यानंतर पतीलाही संशयितांनी मारहाण केली. ही घटना गुरुवार, 29 जून रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गिरणा टाकी परीसरात घडली. याप्रकरणी शनिवार, 1 जुलै रोजी रामानंदनगर पोलिसात चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एका भागात विवाहिता पतीसह वास्तव्यास आहे. गुरुवार, 29 जून रोजी रात्री 10.30 वाजता विवाहिता पतीसह औषधी घेण्यासाठी गिरणा टाकी परीसरातील मेडीकलवर जात असताना संशयित किरण जोहरे, जितेंद्र सोनवणे, राज पवार व दीपक अहिरे यांनी विवाहितेकडे पाहून शिट्ट्या वाजवित विवाहितेची छेड काढली. याप्रसंगी राज पवार याने विवाहितेची छेड काढत असल्याने विवाहितेच्या पतीने त्यास हटकले असता, त्याने विवाहितेच्या पतीला शिविगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली तर त्याच्यासोबत असलेल्या तिघांनीदेखील मारहाण केली. आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. शुक्रवारी दाम्त्याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित किरण अहिरे, जितेंद्र सोनवणे, दीपक अहिरे, राज पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार दीपक पाटील करीत आहेत.


