भुसावळातील आरोग्य सेवक मयूर अंजाळेकर यांचा ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने गौरव
भुसावळ : शहरातील आरोग्य सेवक मयूर राजेंद्र अंजाळेकर यांचा खान्देश भूषण 2023 पुरस्काराने रविवार, 2 जुलै रोजी सायंकाळी जळगाव येथील हॉटेल पॅराडाईजमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्धी मराठी सिने अभिनेते विजय पाटकर यांच्याहस्ते अंजाळेकर यांचा सन्मान करण्यात आला. मयूर अंजाळेकर यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विविध क्षेत्रातील कर्तृतत्ववान व्यक्तींचा सन्मान
शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारीता, व्यावसायीक, वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रात भरीव कार्य करणार्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. सप्तरंग इव्हेंट अॅण्ड मॅनेजमेंटतर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र अंजाळेकर यांची उपस्थिती होती.

