जळगावात प्रवचनातून धर्मांतराचा प्रयत्न : चौघांना अटक


Attempted conversion through preaching in Jalgaon : Four arrested जळगाव : हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात प्रवेश करण्यास सांगणा-या चौघा ख्रिश्चन धर्म प्रचारकांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव-भुसावळ महामार्गावरील मंगलम लॉन येथील हॉलमधे जमलेल्या सुमारे 40 जणांसमोर प्रवचनाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतर तुमचे सर्व रोग दूर होतील, असा प्रचार आणि हिंदू धर्माबाबत अपप्रचार सुरू असल्याचे बघून कीर्तनकार तथा कथाकार योगेश कोळी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.

असे आहे नेमके प्रकरण
कीर्तनकार योगेश कोळी यांना चुलत भावाच्या वाढदिवसानिमित्त हॉल हवा असल्याने ते महामार्गावरील हॉल बघण्यास आले असता त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि हिंदू धर्माचा अपप्रचार सुरू असल्याचे लक्षात आले. केवळ ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतरच तुमचे विकार नाहीसे होतील, असा प्रचार या ठिकाणी सुरू होता तर जमलेल्या भोळ्या आणि अशिक्षीत लोकांना धर्म बदल करण्याची इच्छा नव्हती.

यांच्याविरोधात गुन्हा
एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी सीना संतोष पाटील (41, रा. कोल्हे हिल्स जाणता राजा शाळेजवळ जळगाव, मूळ रा.केरळ), पवन दीपक सारसर (25, रा.मण्यारखेडा), राजकुमार हरीशंकर यादव (47, रा.खेडी, मूळ रा.उत्तर प्रदेश), प्रदीप बाजीराव भालेराव (49, रा.वाघनगर, जळगाव) आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार किरण पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !