अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी : भुसावळात भाजपाचा जल्लोष
भुसावळ : राष्ट्रवादीत झालेल्या राजकीय भूकंपानंतर उपमुख्यमंत्री पदावर अजित पवारांची वर्णी लागल्यानंतर भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. सुरभी नगरातील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अजित पवारांच्या शपथविधीनंतर जल्लोष करण्यात आला.
यांची जल्लोषप्रसंगी उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे यांच्यासह माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, मनोज बियाणी, सदानंद उन्हाळे, गिरीश महाजन, सुनील महाजन, पिंटू ठाकूर, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, सतीश सपकाळे, प्रा.दिनेश राठी, किरण कोलते, निकी बत्रा, अनिरुद्ध कुलकर्णी, देवा वाणी, अतुल झांबरे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, अजय नागराणी, रमाशंकर दुबे, राहुल तायडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

