चाळीसगावातील उच्च शिक्षित तरुणीचे लग्न मोडणार्या तरुणाविरोधात गुन्हा
A crime against a young man who broke the marriage of a highly educated young woman in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या व उच्च शिक्षीत तरुणीचा पाठलाग करून तिला सातत्याने विविध क्रमांकावरून त्रास देणार्या व तरुणीचे लग्न मोडणार्या तरुणाविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा
25 वर्षीय तरुणी उच्च शिक्षीत असून चाळीसगाव शहरात वास्तव्यास आहे. तरुणीचे 23 जून रोजी लग्न ठरलेल परंतु ओळखीतील अमित राजेंद्र शिरुडे याने वेळोवेळी तरुणीला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन, मॅसेज करून तसेच फिर्यादीचे जमलेल्या लग्नठिकाणी खोटेनाटे सांगून तिचे नियोजीत लग्न मोडले तसेच माझ्यासोबत लग्न कर असे म्हणून सतत ऐनकेन प्रकारे फोनवर पाठलाग केला. वेगवेगळे मोबाईल नंबर वापरून त्रास देऊन, मानसिक छळ करून, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले तर तरुणीसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला व पीडीतेच्या आई वडिल, नातेवाईक अशांना शिवीगाळ करून धमकी आरोपीने दिली. प्रकरणी अमित शिरुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीखक दीपक बिरारी करीत आहेत.


