जळगावात घरफोडीतील चोरीचे सोने घेणार्या सराफालाही बेड्या
In Jalgaon, the bullion who took the stolen gold from the house burglary was also handcuffed
जळगाव : घरफोडीतील चोरीचे सोने घेणार्या सराफाला जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्याने जळगावातील सराफा वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील गणपती नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड लांबविणार्या दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी चोरीचे दागिणे सराफाकडे विकल्याची कबुली दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
निरज सुरेशचंद्र छाजेड असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
असे आहे चोरीचे प्रकरण
शहरातील गणपती नगरातील विशाल जैन यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण तीन लाख 58 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आल्याची घटना सोमवार, 12 जून रोजी उघडकीला आली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित आरोपी राकेश गोकुळ राठोड आणि उमेश गोकुळ राठोड या दोघांना अटक करण्यात आली. संशयितांनी चोरीचा माल जळगावातील निर्मल सराफ दुकानात विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी निरज सुरेशचंद्र छाजेड याला रविवारी दुपारी अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई रामानंद नगर पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी यांनी केली.


