भुसावळ श्रमिक पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी संजयसिंग चव्हाण तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ बिनविरोध
भुसावळात श्रमिक पत्रकार संस्थेचे गठण : विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय
Sanjaysingh Chavan as President of Bhusawal Shramik Journalist Association and Ganesh Wagh as Vice President unopposed भुसावळ : शहरातील पत्रकारांनी एकजूट होत भुसावळ श्रमिक पत्रकार संस्था स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी संजयसिंग चव्हाण तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची मंगळवार, 4 जुलै रोजी झालेल्या सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. भुसावळातील पत्रकारांनी एकसंघ होवून घेतलेल्या निर्णयानुसार शहरात भुसावळात श्रमिक पत्रकार संस्था विविधांगी समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहे.
अशी आहे नूतन कार्यकारीणी
अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, उपाध्यक्ष गणेश वाघ, सचिव हेमंत जोशी, कोषाध्यक्ष श्याम गोविंदा, कार्याध्यक्ष संतोष शेलोडे व निलेश फिरके, सहसचिव अभिजीत आढाव, प्रसिद्धीप्रमुख सुनील आराक, सल्लागार मनोहर लोणे, सहसल्लागार प्रेम परदेशी व अन्य सदस्यांचा नवीन कार्यकारीणीत समावेश करण्यात आला आहे.

समाजोपयोगी उपक्रम राबवणार
भुसावळ शहरात आगामी काळात भुसावळात श्रमिक पत्रकार संस्थेच्या माध्यमातूनच अधिकृतरीत्या पत्रकार परीषद घेतली जाणार आहे. आयोजकांनी वेळेत पत्रकार परीषद सुरू करण्यासह सर्व पत्रकारांना परीषदेचे निमंत्रण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. भुसावळ शहरात यापुढे अधिकृरीत्या पत्रकार परीषद घेण्यासाठी अध्यक्ष संजयसिंग चव्हाण (80070-72121) व उपाध्यक्ष गणेश वाघ (90213-10269) यांच्याशीच संपर्क साधावा, असे आवाहन नूतन कार्यकारीतील पदाधिकार्यांनी केले आहे. भुसावळ श्रमिक पत्रकार संस्थेच्या माध्यमातून शहरात आगामी काळात समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
संजयसिंग चव्हाण, गणेश वाघ, हेमंत जोशी, नरेंद्र पाटील, वासेफ पटेल, निलेश फिरके, श्याम गोविंदा, हबीब चव्हाण, कमलेश चौधरी, प्रेम परदेशी, इम्तियाज शेख, कालू शाह, सद्दाम खाटीक, सुनील आराक, मनोहर लोणे, हर्षल पाटील, कलीम पायलट, ईकबाल खान, संतोष शेलोडे, निलेश वाणी, सतीश कांबळे, राजू चौधरी, अभिजीत आढाव, विनोद गोरधे, राहुल वानखेडे आदी प्रिंट, इलेक्ट्रीक माध्यमांचे 25 प्रतिनिधी, छायाचित्रकार उपस्थित होते.
