तारखेडा खुर्दच्या कंत्राटी वायरमनची आत्महत्या


Suicide of contract wireman of Tarkheda Khurd पाचोरा : घराच्या छताला दोराद्वारे गळफास घेत पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील 27 वर्षीय कंत्राटी वायरमनने गळफास घेतला. मंगळवार, 4 जुलै दुपारी दोन वाजता ही घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. हर्षल जुलाल पाटील असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
हर्षल हे गेल्या दोन वर्षांपासून वीजवितरण कंपनीत कंत्राटी वायरमन म्हणून सेवेत होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता आई, वडील शेतात काम करुन घरी आले असता हर्षल जुलाल पाटील याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. मयत युवकाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे. हर्षल पाटील यांच्यावर सायंकाळी तारखेडा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !