किरकोळ वादातून जळगावात चाकूहल्ला : संशयिताला अटक


Knife attack in Jalgaon due to petty dispute : Suspect arrested जळगाव : वाळूच्या ढिगार्‍यावर थांबलेल्या संशयितांना हटकल्याच्या रागातून पिंप्राळ्यातील राम मंदिर परीसरात एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी याप्रकरणी दोन विधी संघर्षीत बालकांसह एकाला अटक करण्यात आली. भूषण मनोज अहिरे (20, रा.विद्यानगर) असे अटकेतील संशयिताचे नाव असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली तर विधी संघर्षीत बालकांची बालसुधारगृहात रवागनी करण्यात आली.

असे आहे नेमके प्रकरण
शहरातील पिंप्राळा परिसरातील राम मंदिर परीरात निलेश दुबे हे वास्तव्यास असून त्यांच्या घरासमोरील वाळूच्या ढिगार्‍यावर काही तरुण बसले होते. दुबे यांनी त्या तरुणांना इथे का थांबले असे म्हणले असता, त्याचा राग आल्याने त्या तिघांनी दुबे यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर चाकूने वार करीत जखमी केले तसेच त्यांच्या खिशातून 15 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल. तरुणावर वार करणारे तिघे पिंप्राळ्यातील असल्याची माहिती तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांसोबत पिंप्राळा परिसरातून दोन विधी संघर्षीत बालकांसह भूषण मनोज अहिरे (20, रा. विद्यानगर) याला ताब्यात घेतले व त्यांच्याकडून हिसकाविलेला मोबाईल जप्त केला. संशयिताला मंगळवारी दुपारी दोन वाजता न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोघा विधी संघर्षीत बालकांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !