एरंडोल शहरात दुकान फोडून पावणेतीन लाखांचे मोबाईल लांबवले
Three lakh mobile phones were stolen after breaking into a shop in Erandol town एरंडोल : शहरातील शेतकी संघ कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाख रुपये किंमतीचे 19 मोबाईल लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीद्वारे चोरट्यांचा कसून शोध
गोपाल देविदास दांडगे (38, अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) यांचे शेतकी संघ कॉम्प्लेक्समध्ये गाळा क्रमांक 11 मध्ये हरीओम एंटरप्रायजेस नामक दुकान असून 3 रोजी सायंकाळी सात ते 4 रोजी सकाळी दहा दरम्यान चोरट्यांनी संधी साधून दुकानाचे पत्री शटरचे कुलूप तोडून दुकानातील तीन हजारांच्या रोकडसह 19 मोबाईल मिळून दोन लाख 88 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दांडगे यांनी एरंडोल पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.


