Hatnoor’s four doors Open दमदार पावसाची हजेरी : हतनूरचे चार दरवाजे उघडले : रावेर तालुक्यात चारचाकी वाहिली, दोघे बेपत्ता
Heavy Rains : Hatnoor’s four doors Open : Four wheeler swept away in Raver Taluka ; two missing
भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसानंतर हतनूर धरणाचे गुरुवारी सकाळी 10 वाजता चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे चारचाकी वाहिल्याची तसेच दोघे पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती आहे. रसलपुर येथे पुराच्या पाण्यात चार गुरांचा मृत्यू झाल्याची मातिी समोर आली असून प्रशासनाने नुकसानीची पाहणी केली आहे.
रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर
रावेर तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला. यानंतरदोन ते तीन तास मुसळधार पावसामुळे रावेर शहरातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर येथील नदीला पूर आल्यानंतर नागझिरी व मात्रा नदीत एक जण वाहिल्याची प्राथमिक माहिती आहे. रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील मोठे नुकसान झाले आहे. मोरव्हाल येथील अभोडा नदीत एकाचा मृत्यू झाला तर रसलपूरमध्ये चारचाकी बलेनो वाहून गेली. गाडीत प्रवाशांनी सुदैवाने उडी घेतल्याने सर्व जण बचावले आहेत. तालुक्यातील रमजीपूर रसलपूर, खिरोदा येथील गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे तसेच रमजीपूरमध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहे.
प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा
तहसीलदार बंडू कापसे आणि त्यांच्या सहकार्यांनी मदत कार्यात सहभाग घेतला आहे. रावेर शहरात माजी नगरसेवक सुरज चौधरी आपल्या टिमसह महसूल प्रशासनास सहकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे तर रमजीपुर मध्ये सरपंच प्रकाश तायडे, उपसरपंच योगिता कावडकर, प्रा.उमाकांत महाजन हे ग्रामस्थांना सहकार्य करीत आहेत.
