मुक्ताईनगर तालुक्यात वाळूचे अवैध उत्खनन : महसूल प्रशासनाने बोट केली जप्त
Illegal sand mining in Muktainagar taluka : Revenue administration seizes boat मुक्ताईनगर : तालुक्यातील मेळसांगवे येथील पूर्णा नदीपात्रात वाळूचे अवैधरीत्या बोटीद्वारे उत्खनन होत असताना महसूल प्रशासनाने कारवाई करीत बोट जप्त केली मात्र संशयित पसार होण्यात यशस्वी झाले.
कारवाईने उडाली खळबळ
रविवार, 2 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या कारवाईने अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली. अंतुर्ली मंडळाधिकारी धनराज वैद्यनाथ मुंडे यांनी या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक धर्मेंद ठाकूर करीत आहेत.
