मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Attal accused in mobile phone theft case in Jalgaon crime branch’s net जळगाव : जामनेर पोलिसात मोबाईल चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. संदीप केशव गोपाळ (21, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवार, 5 जुलै रोजी दुपारी दोन वाजता जामनेरात करण्यात आली. संशयिताकडून नऊ हजार 400 रुपयांची रोकड व मोबाईल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, रणजीत जाधव, सचिन महाजन, प्रीतम पाटील, संदीप सावळे, किरण चौधरी ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, संशयित संदीप गोपाळ विरोधात जामनेर पोलिसात मोबाईल चोरीचा गुन्हा (199/2023) दाखल असल्याने त्याचा शोध सुरू असताना तो जामनेरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास बुधवारी अटक करण्यात आली. अधिक कारवाईसाठी त्यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !