15 हजारांची लाच भोवली : नाशिक रोड पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात


15,000 bribe: A bribe-taking police sub-inspector of Nashik Road police station in ACB’s net नाशिक : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याचे आमिष दाखवून 25 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारणार्‍या नाशिक रोड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. ही कारवाई गुरुवार, 6 जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. गणपत महादू काकड (57, रा.आठ, कृष्ण अपार्टमेंट, गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड म्हसरूळ, नाशिक) असे अटकेतील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
नाशिकच्या जेल रोड भागातील बोराडे मळा भागातील 38 वर्षीय तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक काकड हे तपासाधिकारी असल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या बहाण्याने बुधवार, 5 रोजी 25 हजारांची लाच मागून 15 हजार रुपयात तडजोड केली. तक्रारदाराने मात्र एसीबीकडे तक्रार नोंदवल्याने तपासाधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या.






यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार बाविस्कर, प्रकाश महाजन, ज्योती शार्दूल आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !