Dr. Neelam Gorhe उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : डॉ.निलम गोर्‍हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश करणार


Big shock to Uddhav Thackeray: Dr. Neelam Gorhe will enter the Shinde group under the leadership of the Chief Minister मुंबई  : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आता ठाकरे यांच्या विश्वासू मानल्या जाणार्‍या डॉ.निलम गोर्‍हे यादेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. गोर्‍हे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मनिषा कायंदे शिंदे गटात
गेल्यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला. शिवसेनेतील बहुतांश आमदार शिंदेंच्या पाठिशी गेले. जवळपास 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात जात एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. त्यानंतर राज्यभरात पदाधिकारी आणि शिवसैनिकही शिंदेंसोबत जात होते. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतला. सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील महिला आघाडीत प्रचंड वाद सुरू झाले. सुषमा अंधारेंना दिले जाणारे महत्त्व अनेकांना रुचले नाही. त्यातून नाराज होत अलीकडेच मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते पद गमावण्याची वेळ
आता विधान परीषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यादेखील शिंदेसोबत जाणार असल्याने विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील काही बचतगटांमधील महिला-कार्यकर्त्याही नीलम गोर्‍हेंसोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची वेळ उद्धव ठाकरे गटावर आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !